Thursday 11 November 2010

घडल-बिघडल

प्रत्येकाच्या आयुष्यात थोड्याफार घडामोडी होतातच! पण काही घडामोडी अशा असतात ज्यानी एखाद्च सम्पूर्ण आयुष्यच बदलून जात! माझ्या बायको  बरोबर पण अशीच एक घटना घडली, सुमारे पांच वर्षापूर्वी एक बस अपघातात  तिच्या स्पाइनल  काड मध्ये इजा झाली व् कमरेच्या खाली पासूनच्या  भागात इन्द्रिय  चेतना  नाही. व् सर्व अवयव निष्क्रिय झाले आहे! तेंव्हापासूनच तिच्या क्रिया बिस्तर व् व्हीलचेयर वरच सीमित आहे! तस पाहिल  तर आजार म्हणून काहीच नाही पण आपल सर्व आयुष्य परावलम्बी म्हणून जगण ही भावनाच आजार पेक्षा जास्त पीड़ादायक आहे! शिवाय पीड़ित व्यक्तिची सेवा करणं ते ही तीसों दिवस, सादी , सोपी  गोष्ट नव्हे असो! पण प्रत्येकाला आपापल्या  कर्मानुसार भोग भोगावेच लागतात!

हे सर्व जरी सत्य असल, तरी जो व्यक्ति त्या परिस्थितुन जात आहे त्याच्या मन:स्थिति ची कल्पना दूसरा  कोणी ही व्यक्ति ,नाही करु शकतो!अशा आजाराचे  चे उपचार म्हणजे फिजियोथेरपी व् त्यापेक्षा ही जास्त म्हणजे स्वत: मधे जगण्याची इच्छा शक्ति असण  फार गरजेच आहे! माझ्या बायकोच्या बाबतीत मी  ईश्वराचे  आभार मानतो कि, ह्या परिस्थिति मधे सुद्धा, जरी पदोंपदी हीन भावना तिच्या मनावर हावी असली, तरी ही जगण्याची उत्कंठा बळकट आहे!         

ईश्वर तिला व् आम्हा सर्वांना ह्या परिस्थितिला  तोंड देण्याची शक्ति देवो हीच प्रार्थना!

1 Comments:

At 16 November 2010 at 10:24 , Blogger Genie said...

Amen! May god bless you !

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home