Friday 17 June 2011

स्वप्न रंगवितो

मी  स्वप्न रंगवितो ,मी स्वप्न रंगवितो ! 
इन्द्रधनुषी स्वप्न रंगवितो!
मला ठाउक आहे कि,
स्वप्न रंगवायची पण माझी लायकी नाही
कां की मी ह्या जगातला दरिद्री माणुस आहे
तरी ही मी स्वप्न रंगवितो !     
इन्द्रधनुषी स्वप्न रंगवितो !
स्वप्नात तरी, मी बायका व् पोर
पोट भर जेवतो, म्हणून मी स्वप्न रंगवितो ! 
इन्द्रधनुषी स्वप्न रंगवितो !      
मला कोणी झिडकारेल ह्याची भीती नाही 
ह्या करिताच मी स्वप्न रंगवितो  !    
इन्द्रधनुषी स्वप्न रंगवितो !   
मला सकाळ पण नकोशी वाटते
सकाळ झाली कि स्वप्न नाहीसे होतात 
म्हणूनच मी स्वप्न रंगवितो !
इन्द्रधनुषी स्वप्न रंगवितो !
स्वप्नात जगण्याच आनद्च वेगळ असत 
ह्या साठीच मी स्वप्न रंगवितो !
इन्द्रधनुषी स्वप्न रंगवितो !
द्रद्रिद्र्याना पण स्वप्न पाहण्याची  देवा कडून,
फार मोठी देणगी आहे म्हणूनच 
मी स्वप्न रंगवितो ! 
इन्द्रधनुषी स्वप्न रंगवितो !  
  





2 Comments:

At 20 June 2011 at 03:27 , Blogger vaibhav said...

mama its gr8 to see marthi posts coming from you.. n the language reflects dat u r no where a beginner, its really like an experienced n matured writer..

 
At 3 March 2022 at 15:22 , Blogger tacycadd said...

Play Real Money Casinos | Mapyro
Find the 서산 출장마사지 best real 제주 출장샵 money 고양 출장마사지 Casinos in the US. We rank casinos 시흥 출장마사지 based on 원주 출장샵 2581 reviews, with information about bonuses, promotions,

 

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home